dr.satish best web design developer for mac

बड्याचीवाडी ग्रामपंचायत :

गडहिंग्लज शहरातील काही भाग अंतर्भूत असलेले परंतु काळभैरीच्या पांढरीतले छोटसं परंतु भुभागाने विस्तारीत असलेले मौजे बडयाचीवाडी गाव.तसेच काळभैरीची नगरी म्हणुन हे गाव परिचित आहे. काळभैरीच्या सेवेत असणारे पुजारी,मानकरी व हकीमदार यांच्या वास्तव्यासाठी ही नगरी विकसित झाली असावी असे बोलतात.गावातील ग्रामपंचायतीची स्थापना 16 जून 1967 साली झाली. आज इतकी वर्षे झाली गावातील ग्रामपंचायतीचा कारभार खूप चांगल्या प्रकारे चालत आहे. गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. त्यामुळे गावचा विकास झाला आहे.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

बड्याचीवाडी ग्रामपंचायत ही सन 16/06/1967 पासून कार्यरत असून सदस्य संख्या तेरा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.  तसेच ग्रामपंचायतीस निर्मल ग्राम पुरस्कार सन 2010 मध्ये मिळाला आहे.

सरपंच
सौ. गिता आणासो देसाई

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. वैभव बाबूराव साबळे

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री.अर्जुन कृष्णा रेडेकर

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Badyachiwadi Grampanchayat
A/p Badyachiwadi Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416502

CONTACTS
Phone : 9404959010
Office : 02327 – 226500